Popular Posts

Tuesday, October 22, 2013

कळू लागले

   कळू लागले


निसटलेले दिवस आता छळू लागले
जीवन माझे मला आता कळू लागले

थकून गेल्या बघा या जुनाट वाटा
पाय पुन्हा घरांकडे वळू लागले

खरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी
शुभ्र कपडयातले मन आता मळू लागले

पावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली
कडक उन्हाळ्यात, आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, महत्व आयु्ष्याचे
वय दिवसाच्या मागे बघा पळू लागले

कित्येक मैल आता बालपण राहिले दूर
वार्धक्य खुणावताना तारुण्य चळू लागले

पेटते निखारे घेउन संकटे पचवली किती
हिरव्यागर्द मनाचे आतून पानही गळू लागले

निवडणूक अशी लढलो शत्रू भेदला आरपार
जिंकण्याच्यावेळी नेमकेच यार पळू लागले

दशरथ यादव, पुणे

No comments: